सातारा: शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे( गुरुजी ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली असून, या भेटीमुळे राजकीय तर वितर्क लावले जात आहेत. उदयनराजे भाजपात प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकिय चर्चांना उधाण आलं आहे.
भिडे गुरुजी यांनी आज उदयनराजे यांची जलमंदिर येथे जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुदस्त्यातच आहे . या भेटीवर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले “आमची ही भेट राजकीय भेट नसून घरगुती आहे”. तसेच भिडे गुरुजी ही घरातली व्यक्ती असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले.
राजकीय निर्णय काय घेणार या बाबत बोलताना आता राजकारण सोडून तुमच्या सारख्या मित्राच्या बरोबर फिरावं म्हणतोय असे मिश्किल उत्तर उदयनराजेंनी दिलंय. भिडे आणि भोसले भेटीमुळे उदयनराजेंचा भाजपा प्रवेश आणि गुरुजी असं काही समिकरण तर नाही ना असा प्रश्न सातारकरांना पडला आहे.