करोना काळात माणुसकीची ओंजळ
नगरसेविका सोनम मोहिते आणि गणेश मोहिते यांनी प्रभागातील प्रत्येकांसाठी सामाजिक वसा जपला आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी आलेल्या करोनाच्या साथीत नागरिकांना दिलासा देत आधार दिला आहे. कोणलाही समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. अडीअडचणीच्या काळात ही मदत सर्वसामान्यांसाठी लाखमोलाची ठरली आहे. करोना साथीचा प्रसार शहरात वेगाने होत असताना बाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी गणेश मोहिते आणि सोनम मोहिते यांनी निकराचे प्रयत्न केले आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर प्रशासनातील महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांनी काम केले. प्रभागासह शहरातील सर्वसामान्यांचे रक्षण करण्यासाठी ते खऱ्या अर्थाने करोना योद्धा ठरले आहेत. याचा सार्थ अभिामन प्रभागातील नागरिकांना आहे.
भोर शहरातील प्रभाग सातमधील मोहिते कुटुंब. परिस्थिती बेताचीच असताना या कुटुंबाने समाजाप्रती भान ठेवले. सामाजिक कार्यकर्ते गणेश मोहिते यांनी घेतलेला समाजवसा हा नागरिकांना भावला. माजी मंत्री अनंतराव थोपटे (साहेब) व आमदार संग्रामदादा थोपटे यांची खंबीर आणि भरभक्कम साथ, सर्व सहकाऱ्यांचे पाठबळ या जोरावर गणेश मोहिते यांची पत्नी सोनम मोहिते यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत संधी मिळाली. सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला थोपटे यांनी संधी दिल्याने त्यांनी विकासाकामातून संधीचं सोनं केलं. नगरसेविका सोनम मोहिते यांनी प्रभाग सातमध्ये सामाजिक वलय निर्माण केले आहे. कुटुंबीयांनी पाठिंबा दिल्याने सोनम आणि गणेश दाम्पत्याची समाजाप्रती असलेल्या दूरदृष्टीचा घेतलेला आढावा…
भोर शहरातील सर्वसामान्य मोहिते कुटुंब. आजी सासूबाई चारघरची धुणी-भांडी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होत्या. सासरे रोजंदारीवर काम करून हातभार लावीत असतात. या कुटुंबातील गणेश मोहिते यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मिळेल ते काम करून कुटुंबाची कर्त्या मुलाची भूमिका पार पाडत होते. मात्र, त्यांच्यातील सामाजिक कार्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. स्वत:मध्ये समाजकार्याचे भान असल्याने ते संपूर्ण प्रभागातील नागरिकांमध्ये एकरूप झाले. नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग सातमधून गणेश यांच्या पत्नी सोनम मोहिते यांना उमेदवारी मिळाली. आमदार संग्राम थोपटे यांचा आशीर्वाद, गणेश मोहिते यांचा जनसंपर्क, नागरिक, महिलांचा पाठिंबा असल्यामुळे सोनम मोहिते यांनी निवडणुकीत 375 मतांनी विजय मिळविला.
घरची परिस्थिती बेताचीच असताना मोहिते कुटुंबातील प्रत्येकाने गणेश आणि सोनम मोहिते यांना तोलामोलाची साथ आणि पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांचे कार्य आणि काम बहरत गेले. प्रभागातील प्रत्येकांच्या अडीअडचणीला धावून जात सोनम, गणेश मोहिते यांनी सर्वांना आपलेसं केले आहे. सोनम मोहिते यांनी गेल्या दोन वर्षांत नगरसेविका पदाच्या कार्यकाळात रस्ते, गटारी, अन्य समस्या तत्परतेने सोडविल्या. सहजीवन सोसायटीतील 20 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच दिवाबत्तीसाठी नवीन विजेच्या पोलसाठी मंजुरी मिळाली आहे. सोनम मोहिते यांनी प्रभागात सर्वसमावेशक कामे केली आहेत.
त्यामुळे शहरातील समाजाभिमुख युवा चेहरा म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रेरणेने आणि पाठबळावर नगरसेविका सोनम मोहिते यांनी दोन वर्षांत प्रभागातील महिलांमध्ये एकरूप होऊन त्या काम करीत आहेत. सोनम मोहिते या प्रभागात काम करीत असताना पती गणेश मोहिते, सासू रेखाताई बाळू मोहिते, सासरे बाळू मोहिते, आजी सासू लक्ष्मीबाई गणपत मोहिते यांची साथ त्यांच्या वाटचालीसाठी दिशादर्शक ठरली आहे. ही ऊर्जा विकासकामाला बळ देणारी ठरेल. प्रभाग सातमध्ये भोई आळी, भेलकेवाडी, नागोबा आळीचा समावेश आहे. या तीन भागातील कामे परिपूर्ण केली आहेत.
त्यांच्या वाटचालीत माजी मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटे, नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे, सहकारी नगरसेवक, उपनगराध्यक्ष अनिल पवार, माजी उपनगराध्यक्ष संजय जगताप, सर्व नगरसेवक, अधिकारी यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्यांच्या वाटचालीस दिशा देणारी ठरली आहे. भोईराज, जयहनुमान (भेलकेवाडी), नागराज, भगवा ग्रुप, नागेश्वर, महाड नाका आदी तरुण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची साथ मोहिते दाम्पत्यास ऊर्जा देणारी ठरली आहे.
शब्दांकन
भुजंगराव दाभाडे , भोर तालुका प्रतिनिधी