वाघोली (पुणे) – शिवेसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते व पुणे जिल्हा युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख विशाल सातव यांची महाराष्ट्र राज्य शिवसेना युवासेनेच्या सहसचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरूण सरदेसाई यांनी पुणे जिल्ह्यातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये विशाल सातव यांच्यावर सहसचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवसेनेच्या हवेली तालुका व पुणे जिल्हा प्रमुखपदी कार्यरत असताना त्यांनी अनेक आंदोलने व राजकीय, सामाजिक विषयामध्ये सहभाग घेतला आहे. शिवसेना-युवासेनेची ध्येय धोरणे राबवून पक्षवाढीसाठी एकनिष्ठेने काम करणार असल्याचे सातव यांनी यावेळी सांगितले.