मुंबई : तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवणार्या मुंबई इंडियन्सने गेल्या दशकभरात खर्या अर्थाने आयपीएलवर वर्चस्व गाजवले आहे. मात्र, गेल्या हंगामात निराजशक कामगिरी करणारा मुंबईचा संघ दहाव्या स्थानी होता. यंदा आपल्या संघात अनेक बदल करत युवा खेळाडूंना मुंबईने संधी दिली आहे. त्यांच्या संघात युवा खेळाडूंसह अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईचा सामना करणे अनेक संघांना आव्हानात्मक असणार आहे.
यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई अ गटात आहे. त्यांच्या गटात कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ आहेत. आयपीएल 31 मार्चपासून सुरू होत असून अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 वेळापत्रक
सामना 1 : 2 एप्रिल 2023 – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, बेंगळुरू (सायं, 7:30 वा.)
सामना 2: 8 एप्रिल 2023 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई (सायं, 7:30 वा.)
तिसरा सामना: 11 एप्रिल 2023 – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली (सायं, 7:30 वा.)
चौथा सामना: 16 एप्रिल 2023 – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई (दुपारी 3:30 वा.)
5 वा सामना: 18 एप्रिल 2023 – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद (सायं, 7:30 वा.)
सामना 6: 22 एप्रिल 2023 – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, मुंबई (सायं, 7:30 वा.)
सामना 7: 25 एप्रिल 2023 – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद (सायं, 7:30 वा.)
8 वा सामना: 30 एप्रिल 2023 – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई (सायं, 7:30 वा.)
9 वा सामना: 3 मे 2023 – पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मोहाली (सायं, 7:30 वा.)
10 वा सामना: 6 मे 2023 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई (दुपारी 3:30)
सामना 11: 9 मे 2023 – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मुंबई (सायं, 7:30 वा.)
12 वा सामना: 12 मे 2023 – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई (सायं, 7:30 वा.)
13 वा सामना: 16 मे 2023 – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, लखनौ (सायं, 7:30 वा.)
14 वा सामना: 21 मे 2023 – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुंबई (दुपारी 3:30)
असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शौकीन , जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कॅमेरॉन ग्रीन, झ्ये रिचर्डसन, पियुष चावला, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल.