अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच आपला 31वा वाढदिवस सेलिब्रेट केला. हा क्षण खास बनविण्यासाठी विराट कोहली याने कोणतीही कसर सोडली नाही. वाढदिवसानिमित्त या जोडप्याने सायंकाळच्या वेळी नयनरम्य अशा नदी किनारी एकांतात घालविला. त्यानंतर विराटने अनुष्काला एक रोमांटिक अशी कॅंडल लाइट डिनर पार्टी दिली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला लाखो चाहत्यांनी लाईक्स् दिले आहेत.
या व्हिडिओत विराट आपल्या बर्थडे गर्लचा हातात हात घेवून जाताना दिसत आहे. अनुष्काने ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस, तर विराटने व्हाईट कलरचा टी-शर्ट घातलेला आहे. डिनर टेबलवर घेवून जात विराट पहिल्यांदा अनुष्काला खुर्चीवर बसवतो आणि त्यानंतर तो बसतो. हा व्हिडिओ खुपच रोमांटिक असून तो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
दरम्यान, विराट-अनुष्काची जोडी सतत चर्चेत असते. हे रोमांटिक कपल एकमेकांसोबत क्षण व्यतित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. तसेच दोघेही सोशल मीडियावर ऍक्टिव असतात. ते आपल्या पर्सनल लाइफमधील खास क्षण चाहत्यांशी शेअर करतात. तसेच सामाजिक मुद्द्यांवरही ते थेटमध्ये आपले मत मांडत असतात.
https://twitter.com/vikas42827232/status/1123915113210294273