किचनमध्ये काम करतांना आपल्याला नकळतपने गरम भांडीचा चटका बसला की नको नको होते. मात्र एका व्यक्तीने उकळत्या तेलातून फ्राय होत असलेले चिकन काढले आहे. या व्यक्तीचा व्हिडियो सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सोशलवर व्हायरल व्हिडियो जयपूर येथील असून या व्हिडियोमध्ये अली चिकन सेंटरमध्ये काम करणारा विक्रेता चिकन फ्राय बनवताना दिसत आहे. या व्हिडियोतील
विक्रेत्यानं मॅरिनेट करण्यात आलेलं चिकन आधी कढईतील उकळत्या तेलात सोडलं. आणि नंतर चिकन फ्राय होताच उकळत्या तेलातून काढले. या व्हिडियोमध्ये तो याबाबत सांगतांना दिसत आहे.
सोशलवर सध्या हा व्हिडियो चांगलाच चर्चेत आला असून हा व्हिडीओ आतापर्यंत २० लाखाहून अधिक लोकांना पाहिला आहे. हजारो लोकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
रस्त्याशेजारी चिकन फ्राय विकणाऱ्या व्यक्तीचा कारनामा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.