नवी दिल्ली – भारतीय लष्कराने लदाखमधील वास्तविक नियंत्रण सीमेवर पार पडलेल्या अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतला. ज्यामध्ये क्रिकेट सारख्या खेळांचा देखील समावेश होता. समोर आलेल्या माहितीनुसारल,2020 मध्ये जिथे चिनी सैन्यासोबत चकमक झाली होती त्याच गलवान व्हॅलीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी क्रिकेट खेळले. लष्कराने गलवान खोऱ्याजवळ घोडे आणि खेचरांवरही सर्वेक्षण केले. याशिवाय पॅंगोंग तलावावर हाफ मॅरेथॉनसारखे उपक्रमही आयोजित करण्यात आले होते.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराचे जवान गलवान व्हॅलीजवळ क्रिकेट खेळताना दिसले. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.अति उंचीच्या भागात तैनात असलेल्या लष्कराच्या तुकड्या विविध क्रीडा उपक्रम आयोजित करतात. त्यामुळे प्रतिकूल हवामान असतानाही जवानांचे मनोबल कायम आहे.
#WATCH | Indian Army troops playing cricket near the Galwan valley. The Indian Army formations deployed in the area have been engaging in different sports activities in extreme winters at these high-altitude locations
(Source: Indian Army officials) pic.twitter.com/cElsJLFg8I
— ANI (@ANI) March 4, 2023
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोजमध्ये अनेक जवान खेळाचा आनंद घेताना दिसत आहेत. यामध्ये जवान मैदानात बॅटिंगसह बॉलिंग आणि फिल्डींग करताना पाहायला मिळत आहे. मात्र या मैदानाचे निश्चित लोकेशन सांगण्यात आलेले नाही.पूर्व लदाखशी हा भाग जोडला जाऊ शकतो अशी देखील सध्या बोलले जात आहे. लेह स्थित भारतीय सैन्याच्या 14 कॉर्प्सने ट्विट केले की पटियाला ब्रिगेड त्रिशूल डिव्हिजनने शून्याखालील तापमान आणि अती उंचीवर उत्साह आणि शौर्याने क्रिकेट स्पर्धा आयोजित केली.