Video : अनावधानानं माझ्याकडून ‘तो’ शब्द चुकला; अमोल कोल्हेंनी मागितली माफी….

Updated On:

मुंबई – शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या एका वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या सोशल मिडियावर शेअर केला आहे. अमोल कोल्हे यांनी अनावधानानं ‘बेळगावचा’ उल्लेख ‘बेळगावी’ केल्या प्रकरणी त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे.

बेळगावी उल्लेखावरून महाराष्ट्र एकीकरण समितीने खासदार अमोल कोल्हेंवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमा भागातील संतप्त प्रतिक्रियांनंतर खासदार कोल्हे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली असल्याचं दिसून आलं आहे.

आमोल कोल्हे आपल्या व्हिडिओत म्हणतात….

बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहण्याविषयी मला विनंती करण्यात आली होती. परंतु सीमाभागातील माझ्या अनेक मराठी बांधवांनी एकूण पार्श्वभूमीची कल्पना मला दिली.

त्यामुळे तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून मी सदर कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी सदैव सीमावासीय मराठी बांधवांसोबत सोबत होतो, आहे व राहीन.!

आणखी संबंधित बातम्या

IAS Transfers : मोठी बातमी! महाराष्ट्रातील 25 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली; जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली

2026-04-02 23:03:22

IAS Transfers : मोठी बातमी! महाराष्ट्रातील 25 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली; जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली

Pune news : पावसाने पुणे ठप्प.! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण तरीही पोलिस वसुलीतचं रमले

2026-04-02 21:30:05

Pune news : पावसाने पुणे ठप्प.! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण तरीही पोलिस वसुलीतचं रमले

Pune Rain News : धो धो पावसाने पुणेकरांची दाणादाण.! तासाभरातच ८० ते १०० मिमी पावसाची नोंद, नागरिकांची झाली तारांबळ

2026-04-02 19:44:02

Pune Rain News : धो धो पावसाने पुणेकरांची दाणादाण.! तासाभरातच ८० ते १०० मिमी पावसाची नोंद, नागरिकांची झाली तारांबळ

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून 'या' नावांची चर्चा

2026-04-02 19:35:59

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून 'या' नावांची चर्चा

Pune Rain : वादळी पावसाने पुणेकरांना झोडपलं.! शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित, रस्तेही झाले जलमय

2026-04-02 19:04:35

Pune Rain : वादळी पावसाने पुणेकरांना झोडपलं.! शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित, रस्तेही झाले जलमय