मुंबई – प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा पासून रिलीज झाला होता, तेव्हा पासूनच हा चित्रपट सगळीकडे चर्चेत आला होता. विनोदी मसाला ‘सर्कस’ हा चित्रपट 23 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच नाव जितकी अतरंगी आहे तितकेच यातील सर्व पात्र देखील अतरंगी आहेत. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट असून, या चित्रपटाला सिनेरसिकांचा संमिश्र प्रतिसाद दिला असल्याचं दिसून आलं होत.
‘सर्कस’ या विनोदी मसाला चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग सोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, जॉनी लीव्हर, मुरली शर्मा, सुलभा आर्य, सिद्धार्थ जाधव देखील मुख्य भूमिकेत दिसून आले. दरम्यान, तिकीट बारीवर सरासरी कमाई केल्यानंतर आता ‘सर्कस’ ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित करण्यात येणार आहे.
प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या या चित्रपटाचे डिजिटल अधिकार विकत घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता सिनेरसिकांना लवकरच हा कॉमेडी चित्रपट आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येणार आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. पण जर तुम्हाला कॉमेडी चित्रपटांची आवड असेल तर ‘सर्कस’ हा चित्रपट तुमच्यासाठी एक चांगला टाईमपास थ्रिलर आहे. 17 फेब्रुवारीला हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
दरम्यान, या प्रकरणाबाबत नेटफ्लिक्स इंडियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, अनेक प्रसंगी स्ट्रीमिंग अपडेट्सचा दावा खरा ठरला आहे, त्यामुळे असे म्हणता येईल की, येत्या 17 फेब्रुवारीला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.