मुंबई – मागील काही दिवसांपासून माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप करत आहेत. यामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ या नेत्यांवर आरोप केलेत. आता सोमय्या यांच्या निशाण्यावर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचं घराणं आहे.
सोमय्या सध्या लातूर दौऱ्यावर आहेत. लातूरमध्ये सोमय्यांच्या टार्गेटवर माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. विलासराव देशमुख आणि त्यांच्या परिवारानं ज्या ज्या साखर कारखान्यांचा व्यवहार केला आहे, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याच किरीट सोमय्या म्हणाले.
मागील काही दिवसांपासून सोमय्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट करत होते. आता त्यांनी आपला मोर्चा काँग्रेसकडे वळविल्याचं दिसत आहे. लातूर मधील साखर कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी करून डिसेंबर अखेर भ्रष्टाचार समोर आणणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.