आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेक शासकीय आणि निमशासकीय सुविधांचा लाभ घेताना आपल्याला याची गरज भासते. त्याचबरोबर तो हरवला तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
जेव्हा त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक केलेला नसतो, तेव्हा आधार कार्ड डाउनलोड करताना अनेक अडचणी येतात. यामुळे एखादी व्यक्ती आपले आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी इतर पर्याय शोधते. यात वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो.
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवाय तुमचे आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता? ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून सहज करू शकता. चला या सोप्या स्टेप्सने हे काम करूया.
– तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आधी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
– त्यानंतर तुम्हाला वरच्या डाव्या बाजूला माझा आधार (My Aadhar) चा पर्याय निवडावा लागेल.
– माझा आधारचा (My Aadhar) पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला ऑर्डर आधार कार्ड किंवा ऑर्डर पीव्हीसी कार्डचा पर्याय निवडावा लागेल.
– आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा 12 अंकी क्रमांक किंवा 16 अंकी आभासी ओळख क्रमांक भरावा लागेल.
– हे केल्यानंतर, तुम्हाला खालील बॉक्समध्ये सुरक्षा कोड भरावा लागेल.
– सुरक्षा कोड टाकल्यानंतर तुम्हाला My mobile number is not register हा पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला पर्यायी क्रमांक किंवा नोंदणी नसलेल्या क्रमांकाचा पर्याय निवडावा लागेल.
– नंबर टाका आणि ओटीपी पाठवण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर तुम्हाला ओटीपी एंटर करावा लागेल आणि डिक्लेरेशन बॉक्सवर क्लिक करावे लागेल.
– ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला पुढील पायरीवर पेमेंट पर्याय निवडावा लागेल.
– 50 रुपये भरल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डची PDF डाउनलोड करू शकाल. काही दिवसांनी तुमचे पीव्हीसी आधार कार्ड सुद्धा तुमच्या घरी येईल.