Vikas Thackeray । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात भाजपकडून नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर काँग्रेसकडून गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विकास ठाकरे यांनी नुकतीच उमेदवारी अर्ज दाखल केला. मिळलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार ठाकरे यांनी आपल्या संपत्तीची देखील माहिती दिली आहे. विशेष म्हणजे साडेचार वर्षात विकास ठाकरे यांची संपत्ती तब्बल 63 टक्क्यांनी वाढली आहे.
अंदाजे किती आहे विकास ठाकरे यांची संपत्ती
-विकास ठाकरेंच्या संपत्तीत साडेचार वर्षात 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 2019 मध्ये विकास ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिळून एकूण 6 कोटी 18 लाख 11 हजार 330 रुपयांची चल-अचल संपत्ती होती.
– 2024 मध्ये आमदार विकास ठाकरे आणि पत्नी मिळून एकूण 10 कोटी 7 लाख 56 हजार 481 रुपयांची चल-अचल संपत्ती आहे.
– मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये ठाकरे पती-पत्नीच्या नावावर 87 लाख 21 हजार 849 रुपयांचे कर्ज होते, तर सद्यस्थितीत त्यांच्यावर 2 कोटी 92 लाख 58 हजार 69 रकमेचे कर्ज आहे. – – -2018-19 मध्ये ठाकरे व त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न 15 लाख 76 हजार 66 इतके होते.
-2022-23 मध्ये उत्पन्नाचा आकडा 50 लाख 32 हजार 930 एवढा झाला आहे.1 कोटी 2 लाख 52 हजारांची वाहने आहेत. त्यात 72 लाखांची कार विकास ठाकरे यांच्या नावावर आहे.
विकास ठाकरे यांच्याविरुद्ध चार विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून ते सर्व राजकीय स्वरूपाचे आहेत.