मुंबई – अभिनेता विजय देवरकोंडा सध्या आपल्या लायगर चित्रपटामुळे चर्चेत आहे. साऊथमध्ये सुपरस्टार असलेल्या विजयचा लायगरमधून बॉलिवूड डेब्यू होणार आहे. म्हणूनच तो रोज चित्रपटाच्या प्रमोशनसाठी धावा धाव करतोय. कधी मुंबईच्या लोकलमधे फिरतोय तर कधी इव्हेंटद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधतोय. याच निमित्ताने विजयने सगळ्या मराठी माणसांची मन जिकल्याचे पाहायला मिळालं.
विजय देवरकोंडा एका इव्हेंटच्या माध्यमातून लायगरचे प्रमोशन करत होता. इव्हेंट मुंबईत असल्यामुळे विजयला देखील मराठी बोलण्याचा मोह आवरता आला नाही. अवघ्या २ वाक्यांनी त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयाला हात घातला. सुपरस्टार विजय मराठी बोलल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावेळी त्याच्या समोर असलेले मुंबईकर त्याच्या या मराठी बाण्यावर फिदा झाल्याचे दिसून येते.
“Namaskar Mumbai
Kasa ahe tumhi loka” 😭💘He spoke marathi and Hindi throughout 😭🤩🤌feels sooo nostalgic 💘🔥
Dead dead deaddddddd 😭#VijayDeverakonda #Liger pic.twitter.com/XzvmPEmswO— ~Aditi🌸 (@tazbu_forever) July 31, 2022
“नमस्कार मुंबई कसे आहेत तुम्ही लोक” या वाक्याने विजयने सुरवात करताच प्रेक्षकांनी अक्षरशः गोंधळ केला. यानंतर त्याने हिंदीतून संवाद साधला. मी हिंदी बोलतो.. तुम्ही समजून घ्या.. कारण मी मनापासून बोलतोय. साऊथ स्टारने चाहत्यांसाठी केलेला हा संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल हातोय.