बारामतीत उभय नेत्यांची भेट
बारामती – सातारा मोहीम फत्ते केल्यानंतर नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी पवारांचा सत्कार देखील केला.
दरम्यान, याठिकाणी निवडणुकीमध्ये झालेल्या सभा आणि चर्चा याबद्दल दोन्ही मित्रांचा गप्पांचा फड देखील चांगलाच रंगला. दोन्ही मित्रांनी आपल्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. पाहुयात पाटील आणि पवार यांच्या गप्पांचा हा फड…