नवी दिल्ली – एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांच्या राजधानीतील अशोका रस्त्यावरील निवसास्थानाची तोडफोड करण्यात आले. या प्रकरणी हिंदु सेनेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Members of Hindu Sena attack the official residence of @asadowaisi, Member of Parliament from Hyderabad in Delhi today. #AsaduddinOwaisi pic.twitter.com/GqHXWxg9CW
— Asad Ashraf (@Asad_Ashraf88) September 21, 2021
पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी या घटनेला दुजोरा दिला. ते म्हणाले, मांडोली भागात राहणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या पाचही जणांना घटनास्थळावरच ताब्यता घेण्यात आले. ओवेसी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही कृती केल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. अद्याप त्यांच्याकडे तपास सुरू आहे.
दरम्यान या घटनेचा व्हिडियो आता सोशलवर व्हायरल होत असून या विडिओ मध्ये काही लोकांकडून घरावर तोडफोड केली जात आहे.
ओवेसी यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचे काही नागरिकांनी पोलिसांना दूरध्वनी करून कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळावर तातडीने दाखल झाले. त्यांनी आरोपींना घटनास्थळावरच अटक केली. मात्र त्यापुर्वी निवासस्थानचे प्रवेशद्वार आणि खिडक्यांचे नुकसान केले होते, असे एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.