मुंबई : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आणि त्यांच्यावरील आरोपामुळे यंदाचे अधिवेशन चांगलेच गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता या प्रकरणातील तरुणीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात पीडित तरुणीने शेवाळेंवर काही गंभीर आरोप केले आहेत.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पीडित तरुणीचे दाऊदशी संबंध असून तिने आपल्यावर खोटे आरोप केल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र आता या तरुणीने राहुल शेवाळेंनी केलेल्या गंभीर आरोपांना खोडत धक्कादायक खुलासे केले आहेत.त्यासाठी तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तरुणीने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये, “मी भारताची कन्या आहे. मला न्याय हवा आहे. पण माझ्यावर खासदार राहुल शेवाळे दाऊद, पाकिस्तानचे संबंध असल्याचे बिनबुडाचे आरोप करुन ते मला बदनाम करत आहेत. त्यांना आपले गुन्हे लपवायचे आहेत. त्यांनी माझ्यावर शारिरीक मानसिक अत्याचार केले आहेत. माझ्यावर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत.”असे म्हटले आहे.
तसेच,”याच्याविरोधात मी आधीच साकीनाका पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यांच्या राजकीय शक्तीमुळे माझा एफआयआर दाखल करुन घेतला नाही. मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या जीवाला धोका आहे. माझ्यावर दोन खोट्या केसेस केल्या आहेत.” राहुल शेवाळे आणि तिच्या नात्याबद्दल बोलताना, “ते दोन वर्षे माझ्यासोबत कमिटेड रिलेशनशीपमध्ये होते. त्यांनी मला लग्नाचं वचन दिलं होतं, लग्नाचं वचन देऊनच त्यांनी हे नातं सुरू केलं होतं. मला तो दारू पिऊन, शारिरीक, मानसिक अत्याचार करायचा. लग्नाचं विचारल्यावर तो मला आणि माझ्या परिवाराला धमकी द्यायचा”,असा आरोप या व्हिडिओमध्ये या तरुणीने केला आहे.
मैं भारत की बेटी हूं और न्याय चाहती हूं लेकिन मेरे ऊपर खासदार राहुल शेवाले, बेबुनियाद इल्जाम (#dubai #karachi ) लगाकर बदनाम किया जा रहा है सिर्फ इस भारत की बेटी को बदनाम नहीं भारत को बदनाम किया जा रहा है मैं इस ट्वीट के माध्यम से बताना चाहती हूं1/2 @NIA_India pic.twitter.com/ebWYOZygRA
— Rinki Baxla (@BaxlaRinki) December 27, 2022
दाऊदशी कनेक्शन असल्याच्या शेवाळेंच्या आरोपाला उत्तर देताना ही तरुणी म्हणाली,” मी फॅशन डिझायनर असून दुबईची आहे. माझी तिथे कंपनीसुद्धा होती. माझे तिथे सगळ्या देशातले मित्रही आहेत. म्हणून तो माझ्यावर दाऊन, पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचे बिनबुडाचे आऱोप करत आहे. माझं काहीही कनेक्शन असेल, तर मी एनआयएला विनंती करते, की तुम्ही कधीही माझे कॉल रेकॉर्ड चेक करा. माझा पासपोर्ट पाहा, मी देशातल्या प्रत्येक व्यक्तीला एक एक कॉपी पाठवते. त्याचं म्हणणं आहे की, मी दोन वेळा कराचीला गेले आहे. माझा पासपोर्ट चेक करा. मी दुबईतही तक्रार केली, तर तिथेही त्याने मला अटक करायला लावली. मी ७८ दिवस जेलमध्ये होते, आता सुटून आले, तर इथेही तो मला त्रास देत आहे.” असे या तरुणीने सांगितले.
“मला जेव्हा तो दुबईला भेटायला यायचा, त्यानंतर तो कुठे जायचा, तो किती वेळा पाकिस्तान, कराचीला गेलाय, ते सगळं चेक करा, त्याचा पासपोर्ट चेक करा, त्याची संपत्ती करा. त्याचे काय लेव्हलचे दुबईचे कनेक्शन आहेत चेक करा. त्याने तिथल्या सुनावणीचे कोर्टातले, जेलमधले फोटोही घेतले आहेत, त्यामुळे त्याचं कनेक्शन चेक करा. फक्त या भारताच्या कन्येलाच नव्हे तर भारतालाही बदनाम केलं जात आहे. मला न्याय हवा आहे. माझा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे”. असे व्हिडिओच्या शेवटी तिने म्हटले आहे. दरम्यान, या तरुणीच्या आरोपांना राहुल शेवाळे काय उत्तर देणार हे पाहणे गरजेचे आहे.