मुंबई – रेल्वे स्थानकावर अनेक जण दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी रेल्वेब्रीजचा वापर करण्याऐवजी रेल्वे रुळावरून जातात. वास्तविक पाहता अशा प्रकारे रेल्वे रुळ ओलांडने अत्यंत धोकादायक असतं. यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कल्याण स्थानकात अशीच एक घटना घडली. मात्र मोटरमनने वेळीच ब्रेक दाबल्याने एका वृद्धाचा जीव वाचला.
कल्याण स्थानकावर मुंबई-वाराणसी रेल्वे दाखल होत होती. त्याचवेळी एक वृद्ध नागरिक रेल्वे रुळ ओलांडत होता. हेच मोटरमनला दिसलं. हे पाहताच मोटरमनने प्रसंगावधान दाखवून अपात्कालीन ब्रेक दाबलं.
मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वेच्या चाकाखाली येण्यापासून वृद्ध व्यक्ती थोडक्यात बचावला. काही सेकंदाच्या फरकाने वृद्धाचा जीव वाचला. रेल्वे इंजिनच्या पहिल्या चाकाजवळ वृद्ध व्यक्ती अडकला होता.
Video : मोटरमनने वेळीच ब्रेक दाबला अन् वृद्धाचा जीव वाचला; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/xHLVsLU1Oe
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) July 18, 2021
दरम्यान रेल्वेचे लोकोपायलट आणि सहाय्यक पायलट तातडीने खाली उतरले. त्यांनी इंजिनखाली अडकलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलं. या घटनेत प्रसंगावधान दाखवणाऱ्या मोटरमनचं कौतुक करण्यात येत आहे.