देहूरोड – एटीएम मधून पैसे काढताना एका वृद्धाला अज्ञात चार ते पाच जणांच्या टोळक्याने लुटण्याचा प्रयत्न केला. नेमक्या यावेळी झालेल्या आरडा-.ओरडीमुळे या टोळक्याने पळ काढला. घटनास्थळावरून पोलिसांनी एक वाहन, मोबाईल आणि एक लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे .ही घटना विकासनगर किवळे येथे रविवारी (दि.24) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली .
विकासनगर किवळे येथील महामार्ग बाह्यवळण महामार्गालगत असणाऱ्या शिंदे पेट्रोल पंपजवळ बॅंक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम आहे. एक वयोवृद्ध व्यक्ती या एटीएममधून रक्कम काढण्यासाठी सकाळी साडे अकराच्या सुमारास आले. एटीएममधून रक्कम काढत असताना चारचाकी वाहनातून (क्र.एम एच 01,सी जे 2444) आलेल्या अज्ञात चार ते पाच लुटारूंनी लुटण्याचा प्रयत्न केला.
मात्र वृद्धाने आरडाओरडा केल्याने तेथील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. एखादी वेगळ घटना घडत असल्याचा संशय आल्याने नागरिक एकत्र जमण्यास सुरूवात झाली. व आरडाओरडा सुरू झाल्याने लुटारूंनी वाहन सोडत तेथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनानास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत वाहन व वाहनातील रोकड जप्त केली आहे.