#व्हिडिओ : प्रभास ‘पंतप्रधान’ झाला तर करणार ‘हे’ काम

मुंबई- सध्या चित्रपटसृष्टीत ‘साहो’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर अभिनेता प्रभास आता ‘साहो’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साहो’चा ऍक्‍शन पॅक ट्रेलर रिलीज करण्यात आला होता, या ट्रेलरला काही तासातच चित्रपटाच्या ट्रेलरला जोरदार लाईक मिळायला लागले आहेत.


अशातच  या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रभासह श्रद्धा कपूर सोनी वाहिनीवरील  प्रसिद्ध शो  द कपिल शर्मा शो येणार आहे. दरम्यान, सोनीवहिनीने या शो चा प्रोमो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.


या प्रोमोमध्ये  कॉमेडी किंग कपिल प्रभासला प्रश्न विचारतो तुला एका दिवसासाठी पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर तू काय करशील? या प्रश्नाचे उत्तर प्रभासने फार गमतीशीर दिले आहे. प्रभास सांगतोय, मी इंडस्ट्रीतील मुलाखती सगळ्यात पहिल्यांदा बंद करेन हे ऐकल्यावर कपिलच नव्हे तर उपस्थित असलेले सगळेच खळखळून हसताना दिसत आहेत.

दरम्यान, ऍक्‍शन लव्हर्स प्रेक्षकांना साहो चित्रपट नक्की आवडेल, असा मालमसाला यामध्ये ठासून भरलेला आहे. सध्या चित्रपटाच्या दमदार ट्रेलर मुळे फॅन्स देखील भलतेच एक्‍साईट झाले आहेत.  ‘साहो’मध्ये अभिनेता प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये (30 ऑगस्टला) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरुण विजय आणि मुरली शर्मा, अशी तगडी स्टारकास्ट भरली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here