नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील महसूल विभागात कार्यरत असलेल्या १२ महसूल सहायकांची अव्वल कारकून या पदावर पदोन्नती झाली आहे. अव्वल कारकूनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांचे नाव, कंसात सध्या कार्यरत असलेले ठिकाण आणि पदोन्नती याप्रमाणे – एस. एन. धोंगडे (राहुरी)- उपविभागीय अधिकारी कार्यालय शिर्डी, एम. के. उगले (संगमनेर)- मंडलाधिकारी, पिंपरणे (ता. संगमनेर), वाय. के. बहुरे (नाशिक)- अपर जिल्हाधिकारी कार्यालय- शिर्डी, एस. के. घोलप (नाशिक)-जिल्हा पुरवठा विभाग, के. आर. सोनटक्के (पाथर्डी)-पुरवठा शाखा,
ए. बी. ननवरे (राहुरी)- महसूल शाखा, एस. आर. सोनटक्के (पाथर्डी)- महसूल शाखा, पी. ए. कांबळे (कर्जत)- आपत्ती व्यवस्थापन, एन. व्ही. कंतेवाड (कर्जत)- तहसील कार्यालय-नगर, ए.आर. नरोडे (कर्जत)-गोदाम व्यवस्थापक, तहसील कार्यालय श्रीरामपूर, एस. व्ही. सावळे (श्रीरामपूर)-गौण खनिज शाखा, एस. के. परदेशी (विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे प्रतिनियुक्ती) – विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक.