मुंबई – अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. सध्या त्या वेब सीरिजच्या दुनियेत खूप सक्रिय आहेत. त्यांच्या बोल्ड लुकची देखील नेहमीच चर्चा रंगलेली असते. नुकतेच ‘ट्रायल पीरियड’च्या यशानंतर आयोजित केलेल्या पार्टीमध्ये नीना गुप्ता सहभागी झाल्या होत्या. मात्र या पार्टीत त्यांनी केलेल्या लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. या पार्टीतील त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वयाच्या 64 व्या वर्षी देखील नीना गुप्ता ग्लॅमरस दिसत आहे. पार्टी जाण्यासाठी नीना कारमधून उतरल्यानंतर त्यांनी पापाराझींसाठी पोझ दिली. त्यानंतर लिफ्टच्या इथे त्या थांबलेल्या दिसत आहे. या पार्टीसाठी त्यांनी काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. सोबत काळ्या रंगाचे बूट आणि गॉगलही घातला होता. त्यांचा हा लुक अनेकांच्या पसंतीस पडला आहे. तर काही जणांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. ‘वय लक्षात घेऊन कपडे घाला’, ‘असे विचित्र कपडे घालणे आणि आनंदाने जीवन जगणे यात काही संबंध नाही’, अशाही कमेंट काही नेटकऱ्यांनी केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, नीना गुप्ता यांनी जाने भी दो यारो, खलनायक, बधाई दो, छोकरी, गुड बाय आणि ऊंचाई या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी पंचायत, मसाबा मसाबा आणि पंचायत 2 या ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. लवकरच ‘पंचायत 3’देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पंचायत’ मधील नीना गुप्ता यांची मंजू देवी ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली आहे.