पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर येथील यू. एफ. एफ. सी. क्लब वतीने जिल्हास्तरीय वोविनाम व ग्रेपलिंग स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत आर्या मार्शल आर्ट्स संघास प्रथम क्रमांकाचे, तर यू. एफ. एफ. सी. क्लब व एम. एम. स्कूल यांना उपविजेतेपद मिळाले.
या स्पर्धेत एम. एम. स्कूल, यू. एफ. एफ. सी. क्लब, सायको एम. एम. ए. क्लब व आर्या मार्शल आर्ट्स या क्लबच्या सुमारे ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा वोविनाम असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष रवि गायकवाड व ग्रॅपलिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षा स्नेहल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
पंच म्हणून नरेश मैत्री, पल्लवी पाटील, ऋतिका वाघमारे, मनोज धावारे, ओम पाटील, गौरी सावंत, भार्गवी मिसाळ, तमन्ना गिरी, स्वराज गायकवाड यांनी काम पाहिले विजेत्या खेळाडूंची निवड रामटेक नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ग्रेपलिंग स्पर्धेसाठी झाली आहे. संस्थेचे सेक्रेटरी विकास जगताप व अरुण घोडेकर यांनी आभार मानले.