मिस्टर लेले मध्ये कियारा आडवाणीबरोबर वरुण धवन दिसणार होता. मात्र आता वरुण धवनला या रोलमधून काढून त्याच्या जागेवर विकी कौशलला घेण्यात आले आहे. करोनाच्या वाढत्या साथीमुळे निर्मात्यांनी या सिनेमाचे शुटिंग काही दिवस थांबवले होते.
मात्र आता लीड ऍक्टर बदलल्यानंतर सिनेमाचे शुटिंग सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात “मिस्टर लेले’चे शुटिंग मुंबईत सुरू झाले आहे. सध्या तरी हे शुटिंग मुंबईतच होणार आहे. करोनाची साथ फारच वाढली तर दुसरीकडे शुटिंग करण्याबाबत विचार केला जाईल.
यापूर्वी डायरेक्टर शशांक खेतानने वरुणची निवड निश्चित झाल्याचे म्हटले होते. वरुणने देखील स्वतःचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. मात्र, सर्व कलाकारांच्या तारखा मिळत नव्हत्या, म्हणून शुटिंग थोडे दिवस स्थगित केले गेले होते. मात्र, वरुणच्या जागेवर विकी कौशल कसा निवडला गेला, हे समजू शकलेले नाही. विकी कौशल आणि कियारा आडवाणी यांनी पूर्वी “लस्ट स्टोरीज’मध्ये एकत्र काम केले होते. विकी कौशल एकापाठोपाठ एक “सरदार उधमसिंग’, “अश्वत्थामा’ आणि सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्येही दिसणार आहे.