मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर (दि. 7 डिसेंबर) हे दोघे लग्नबंधनात अडकले.
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या जोडीने आपल्या कुटूंबीयांसमोर सात फेरे मारून आपल्या वैवाहिक जीवनाची सुरवात केली आहे.
विकी-कतरीना यांच्या या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. तर काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मात्र, या सगळ्यात एक पोस्ट चांगलीच चर्चेत ठरली आहे. ती म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्माची. अनुष्काने आपल्या इन्स्टा ग्रामवर या विकी-कतरिनाचा सुंदर फोटो शेअर अभिनंदन केलं आहे.
अनुष्काने पोस्ट मध्ये लिहलं कि, “दोन सुंदर लोकांचे अभिनंदन. तुम्हा दोघांना प्रेमाने भरलेले आयुष्य लाभो हीच सदिच्छा. तुम्ही अखेर लग्न केले याचा आनंद झाला, त्यामुळे आता तुम्ही
तुमच्या घरात जाऊ शकता आणि आम्हाला येणारा बांधकामाचा आवाज आता निदान थांबू शकतो’. असं अनुष्का म्हणते. मिळालेल्या माहिती नुसार, विराट-अनुष्का यांच्या सि-फेसिंग फ्लॅट शेजारीच कतरिना आणि विकीने एक नवीन फ्लॅट भाड्याने घेतला आहे.