गोंदिया – पोलीसदलातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना गोंदिया येथील सालेकसात घडली आहे. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
ज्योती यशवंत बघेले, वय 28 असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्या सालेकसा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. ज्योती यांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सालेकसा पोलीसांनी धाव घेतलीआहे.
ज्योती यांचा 2017 मध्ये रमेश गिरिया यांच्याशी विवाह झाला होता. त्यांचे पती सुद्धा पोलीस दलात असून तेसुद्धा सालेकसा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. त्यांना एक अडिच वर्षाचा मुलगा सुद्धा आहे.
पोलिस स्टेशनमध्ये कामावर असताना ज्योती अचानक घरी निघून गेल्या. यावेळी त्यांचे पतीही पोलिस स्टेशनमध्ये होते. मात्र बराच वेळ झाला तरी पोलिस स्टेशनमध्ये परतल्या नाहीत म्हणून विचारपूस केली तेव्हा ज्योती यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे कळाले आणि सर्वांना धक्काच बसला. पुढिल तपास पोलिस करत आहेत.