बेंगळुरू – कन्नड चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते मनदीप रॉय यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते 74 वर्षांचे होते. चित्रपटसृष्टीत ते विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. (Veteran Kannada actor Mandeep Roy passes away) त्यांनी तब्बल 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
या ज्येष्ठ अभिनेत्यावर हृदयविकाराच्या झटक्यामुळे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली.मनदीप रॉय हे मुळचे बंगाली होते. ते बेंगळुरूमध्ये स्थायिक झाले होते.
Republic Day 2023 : महाराष्ट्र NCC संचालनालयास सलग दुसऱ्यांदा ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद
रंगभूमीच्या पार्श्वभूमीतून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेल्या या दिवंगत अभिनेत्याने ‘मिनचिना ओटा’, ‘पुष्पका विमान’, ‘देवारा अता’, ‘नागरहवू’, ‘आपला रक्षक’, ‘अमृताधारे’ आणि ‘कुरीगालू सार कुरीगालू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपली छाप पाडली होती. ‘