मुंबई – मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. आज (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते. त्याचप्रमाणे त्यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये रसिकांची पसंती मिळाल्याचं पाहायला मिळालं.
‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘वासूची सासू’, ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘लफडा सदन’ ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली. बाप तशी पोरं’, ‘आधार’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘घायाळ’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’ यांसारख्या चित्रपटांतून अविनाश खर्शिकर घराघरात पोहोचले.