लंडन – जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचे नाव घेतले जाते पण या विद्यापीठात शिक्षण देण्याचे काम करणाऱ्या अनेकांना अतिशय कमी पगारावर राबवले जाते या विद्यापिठातील दोन तृतीयापेक्षा जास्त कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आले आहेत विद्यापीठाची स्वतःची अशी मालमत्ता 64 हजार कोटी रुपयांची आहे शिवाय गेल्यावर्षी या विद्यापीठाला संशोधन अनुदान म्हणून तब्बल 80 कोटी पौंड निधी प्राप्त झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यापीठाकडे पैसे असूनही शिक्षकांच्या पगारावर मात्र अतिशय नाममात्र रक्कम खर्च केली जाते.
ब्रिटनमधील शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना मुळात कंत्राटी तत्वावरच वेतन दिले जाते पण हेच प्रमाण ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये एक तृतीयांश नसून दोन तृतीयांश आहे.
कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना सोयी सुविधाही दिल्या जात नाहीत त्यांना ब्रिटनमध्ये अत्यावश्यक असलेले बिजनेस कार्ड मिळत नाही त्याशिवाय त्यांना रजा घेण्याच्या सोयी सुविधाही अतिशय कमी आहेत याशिवाय करारामध्ये कधीही बदल केले जाऊ शकत आणि कोणाला कधीही कामावरून काढले जाऊ शकते.
एकीकडे कामाच्या अटी आणि शर्ती अतिशय जाचक असताना तेवढ्या प्रमाणात वेतनही चांगले मिळत नाही येथील शिक्षकांना एक तास शिकवल्यावर 25 पाउंड मिळतात पण एक तास शिकवण्यासाठी त्यांना अनेक वेळा दिवसभर तयारी करावी लागते त्याचा कोणताही विचार त्यांच्या वेतनाबाबत केला जात नाही विद्यापीठामधील अनेक शिक्षकांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये या विषयासंदर्भात तीव्र आंदोलनही केले होते आणि काही दिवस काम बंद ठेवले होते तरीही अद्याप या परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही ब्रिटनसारख्या आधुनिक देशामध्ये जर व्यवस्थित जीवनमान जगायचे असेल तर वर्षाला किमान 14000 ते 21000 पाउंड उत्पन्न मिळणे अपेक्षित असते पण ऑक्सफर्डमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना हा आकडा कधीही गाठता येत नाही