देहूगाव, (वार्ताहर) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या अनुषंगाने देहूमध्ये प्रवेश करणारे मार्गावरुन वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे. बेकरी खाद्यपदार्थासह प्रतिदिनासाठी आवश्यक इतर वस्तूच्या वाहनांना सकाळच्या वेळेत सोडण्याची मागणी स्वप्निल मोरे यांनी केली आहे.
बीज सोहळ्यातील भाविकांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सोमवार (दि. २५) पासूनच देहूत प्रवेश करणाऱ्या मार्गांवर वाहनांची प्रवेश बंदी केली आहे. सोहळा बुधवारी (दि.२७) होणार आहे.
गॅस सिलेंडर, दुध वाहने त्याचप्रमाणे इतर जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या वस्तूंमध्ये ही प्रतिदिन ताजे खाद्यपदार्थ विक्रीमध्ये बेकरी खाद्यपदार्थ विक्री केली जात असते. त्यामुळे अशा वाहनांनाही ठराविक वेळेसाठी प्रवेश बंदी न करता सोडण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.