कार्ला, (वार्ताहर) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पादुकास्थान वाकसई येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे. तुकाराम बीजेच्या निमित्ताने हा सप्ताह सोहळा होणार आहे. सोहळ्याचे हे २८ वे वर्ष आहे. सोहळ्यामध्ये सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान प्रवचन, रात्री सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे.
हभप सागर महाराज पडवळ (प्रवचन), हभप अनिताताई मोरे–इंगवले, हभप शिवाजी महाराज आगिवले यांचे प्रवचन झाले. तुषार महाराज दळवी, हभप राजेंद्र महाराज वाघमारे, हभप पांडुरंग महाराज शितोळे यांचे किर्तन झाले.
तसेच आगामी काळात हभप ज्ञानेश्वरी ताई वायभट (प्रवचन), हभप माऊली महाराज काकडे (कीर्तन) हभप सुखदेव महाराज ठाकर (प्रवचन) व विशाल महाराज खोले (कीर्तन) हभप प्रवीण महाराज केदारी (प्रवचन), हभप चांगदेव महाराज काकडे (कीर्तन), हभप गणेश महाराज फाळके (प्रवचन), तुकाराम महाराज बीज निमित्त सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये हभप सुभाष महाराज गेठे व हभप सुदर्शन महाराज शास्त्री यांचे किर्तन होणार आहे.
तसेच सकाळी दहा ते दुपारी बारा दरम्यान हभप महादेव महाराज बोरडे (शास्त्री) यांचे काल्याचे किर्तन होणार असल्याची माहिती अध्यक्ष भरत येवले व सप्ताह कमिठी अध्यक्ष गणपत भानुसघरे यांनी दिली.