मुंबई : बॉक्स ऑफिसवर “वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील कथा आणि बोल्ड सीनबाबीसाठी प्रेक्षक आणि समीक्षकांकडून याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच येणार आहे. यासंदर्भात आता खुद्द करीना कपूरने दुजोरा दिला आहे.
करीना कपूरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत “वीरे दी वेडिंग 2′ चित्रपट साकारणार असल्याचे सांगितले आहे. हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शन अवस्थेत आहे आणि पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारी रिया कपूरच दुसऱ्या भागातही काम करणार आहे.
करिना कपूर म्हणाली, मी दुसऱ्या भागात काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. पहिल्या भागातील शूटिंगदरम्यान मला खूप मजा आली होती आणि मला पुन्हा हा अनुभव घ्यायला आवडेल, असे तिने सांगितले.
दरम्यान, “वीरे दी वेडिंग-2′ साकारणार असल्याची यापूर्वीही चर्चा रंगली होती. तसेच सोमन कपूर आणि स्वरा भास्करच्या कास्टिंग झाल्याचे कन्फर्म मानले जात आहे. त्यावेळी करीनाने याबाबत माहिती नसल्यो सांगितले होते, पण आता असे दिसते की प्रेक्षक पहिल्या चित्रपटातील प्रमुख नायिका पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहू शकतील.