बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि वायना नेटवर्कची भागीदारी; सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना पुरवणार चॅनेल फायनान्सिंग सेवा

पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने वायना नेटवर्क या पुरवठा सप्लाय चेन फायनान्स प्लॅटफॉर्मसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगक्षेत्राला आर्थिक सहायता देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या भागीदारीअंतर्गत बॅंक ऑफ महाराष्ट्र वायना नेटवर्कच्या या क्षेत्रातील नैपुण्यांच्या मदतीने सुरु केलेल्या महाबॅंक चॅनेल फायनान्सिंग स्कीम मार्फत लघु अवधीची कर्जे पुरवेल ज्यांच्या साहाय्याने मोठमोठ्या कॉर्पोरेट्‌सच्या डीलर्स,हेंडर्सना आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करता येतील. या भागीदारी अंतर्गत वायना नेटवर्क आपल्या अनोख्या एससीएफ अर्थात सप्लाय चेन फायनान्स सुविधा बॅंक ऑफ महाराष्ट्रला पुरवेल.

बॅंक ऑफ महाराष्ट्रचे एमडी ए. एस. राजीव यांनी सांगितले, नाविन्यपूर्ण डिजिटल सेवा-सुविधा सादर करण्यासाठी आम्ही आघाडीच्या वित्त तंत्रज्ञान कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा यांनी सांगितले, वायनासोबत भागीदारीमुळे बॅंकेला प्रत्यक्ष बाजारपेठेत उतरण्यासाठी आवश्‍यक वेग व पाठबळ मिळाले आहे.

वायना नेटवर्कचे संस्थापक राम अय्यर म्हणाले, सप्लाय चेन फायनान्स किंवा व्यापार, व्यवसायांना वित्त पुरवठा हे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना किफायतशीर कर्जासाठी एक महत्त्वाचे साधन आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.