सर्व शासकीय अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहनाचा वापर बंधनकारक करण्यात यावा – नितीन गडकरी

नवी दिल्ली – सरकारी मंत्रालये आणि विभागातील सर्व अधिकाऱ्यांना इलेक्‍ट्रिक वाहन बंधनकारक करण्याची गरज असल्याचे मत वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केले.

स्वयंपाकाच्या गॅस ऐवजी इलेक्‍ट्रिक कुकींग साहीत्यासाठी सरकारने अनुदान देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गॅसपेक्षा इलेक्‍ट्रिक कुकींग पर्यावरणपूरक असल्याचे त्यांनी सांगितले. एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, मी माझ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना इलेक्‍ट्रिक वाहन बंधनकारक करणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ऊर्जामंत्री आर के सिंग यांनाही त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांना इलेक्‍ट्रिक वाहन बंधनकारक करण्याची सूचना गडकरी यांनी केली. असे केल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल असा दावा गडकरी यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.