दुष्काळी भागांवर वरूणराजा बरसला

अणे -आणे (ता. जुन्नर) परिसरात गुरुवारी (दि. 27) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन तास चालू असणाऱ्या पावसाने ओढे दुथडी वाहू लागले.

दोन वर्षांपासून आणे पठारावर भयंकर दुष्काळ जाणवत होता. आणे, पेमदरा, आनंदवाडी, नळवणे, भोसलेवाडी, कारेवाडी, आनंदवाडी भागातील शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून असे ओढे पाण्याने खळखळून वाहिले नव्हते. यावर्षी चांगला पाऊस झाला तर दुष्काळाचे सावट कमी होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

जून महिना संपत आल्याने काही अंशी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आता पेरणीच्या मार्ग वरती आहेत. पठार भागावर भीषण दुष्काळाचे वास्तव्य होते. दुष्काळात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदी आहेत; परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी आणखी पावसाची अपेक्षा शेतकऱ्याकडून आहे. धरण दोन वर्षांपासून कोरडे आहेत. या पावसाने थोडासा दिलासा मिळाला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.