यंदाच्या वर्षातील सुरूवातीला बॉलीवूड अभिनेता वरुण धवन हा फॅशन डिझायनर नताशा दलालाशी विवाह बंधनात अडकला होता. यानंतर आता वरुण पुन्हा कामावर परतला आहे. त्याने अमर कौशिकच्या “भेडिया’ चित्रपटाचे शूटिंग अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू केले आहे.
या चित्रपटात वरुण धवनसोबत कृति सेनन मुख्य भूमिका साकारत आहे. यापूर्वी रोहित शेट्टीच्या “दिलवाले’ चित्रपटात ही जोडी झळकली होती. दरम्यान, वरुणला अमर यांचा “स्री’ हा चित्रपट खूपच आवडला होता आणि अशाच प्रकारचा चित्रपटात काम करण्यासाठी तो उत्साहित होता. या चित्रपटात वरुण एका राक्षस किंवा दैत्यची भूमिका साकारणार असल्याचे समजते.
अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे अडीच महिने शूटिंग चालणार आहे. या शूटिंग दरम्यान वरुण अन्य कोणत्याही जाहिरातीचे शूटिंग करणार नाही. यात वरुण आणि कृतिसह अभिषेक बनर्जी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हा चित्रपट वर्षाअखेर प्रदर्शित होणार आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास वरुण धवनने “रणभूमि’ हा बिग बजेट चित्रपटातही साइन केला आहे. यात त्याच्यासोबत जान्हवी कपूर रोमांस करताना दिसणार आहे. यानंतर तो राज मेहता यांच्या “जुग जुग जियो’मध्ये काम करणार आहे.