मुंबई – अभिनेता वरून धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनेन यांचा भेडिया चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. वरून धवन या चित्रपटामध्ये काहीश्या हटके अंदाजात दिसणार आहे. त्यामुळे दोघांनीही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंबर कसली आहे. बिग बॉसमध्ये चित्रपटाचे प्रमोशन केल्यानंतर हे दोघेही स्टार्स थेट जयपूरला प्रमोशनसाठी पोह्चल्याचे समजते.
यावेळी जंगल मै कांड हे चित्रपटाचे गाणं देखील जयपूरमध्ये रिलीज करण्यात आलं. वरून धवन आणि क्रितीने जबदस्त असा एनर्जेटिक डान्स केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. जयपूरमध्ये पार पडलेल्या या इव्हेंटसाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. भेडिया चित्रपटाचे पोस्टर फाडत वरूनने यावेळी एंट्री केली आणि प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.
View this post on Instagram
स्त्री चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांचा भेडिया हा चित्रपट आहे. ज्याचे टीजर प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले. त्यानंतर आता वरून आणि क्रिती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध शहरांमध्ये जात आहेत. जयपूरमध्ये त्यांनी एका इव्हेंटदरम्यान हजेरी लावलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.