जगताप, आदियाल मित्र परिवारातर्फे विविध उपक्रम

सांगवी परिसरात वृक्षारोपण, फळ वाटप
सांगवी –
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवार, युवा नेते अमरसिंग आदियाल मित्र परिवार, सांगवी पिंपळे गुरव राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे जुनी सांगवीत वृक्षारोपण, औंध जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, तसेच तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक व चिंचवड विधानसभेचे इच्छुक उमेदवार राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक अतुल शितोळे, माजी महापौर शकुंतला धराडे, माजी नगरसेविका शोभा आदियाल, स्वाती उर्फ माई काटे, युवा नेते अमरसिंग आदियाल, शिवाजी पाडुळे, सचिन आवटे, बाळासाहेब सोनवणे, भाऊसाहेब चांदगुडे, सुषमा तनपुरे, हुसेन मुलानी, शाम जगताप, तानाजी जवळकर, वैशाली जवळकर, बाळासाहेब पिल्लेवार, अतुल काशिद, गणेश जगताप, सतीश चोरमले, अर्जुन शिंदे, सुनील कदम, पंकज मालविया, महेश माने, संदीप राठोड, रूपेश पाटसकर, भाऊसाहेब जांभूळकर, नंदू वाजे, शैलेश दिवेकर आदी उपस्थित होते.

राजेंद्र जगताप म्हणाले की, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार पारदर्शकपणे व विकासाच्या दिशेने सुरू होता. त्यांच्यामुळेच महापालिकेचा देश पातळीवर गौरव करण्यात आला. स्वच्छतेच्या बाबतीत महापालिका अग्रेसर होती.

आज मात्र कचरा समस्येने सर्वजण हैराण झाले आहेत. विकासाच्या नावाखाली शहराला विद्रुप करण्याचे काम केले जात आहे. तर अमरसिंग आदियाल यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी अंतर्गत चाललेल्या कामांमध्ये कोणतेही नियोजन नाही. अजित पवार यांचा महापालिका प्रशासनावर दबदबा होता. सध्या महापालिका प्रशासनावर कुणाचा दबदबाच राहिलेला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)