पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मांजरी येथे वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. यामध्ये दुचाकीसह चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमप्रकाश देशराज सिंग (२६, रा.मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी फुड डिलेव्हरीचे काम करतो, तो ऑर्डर डिलिव्हरीसाठी गेला असता चार जणांच्या टोळक्याने त्याची दुचाकी फोडली.
यानंतर त्याचा मोबाइल फोन आणि साडेसहाशे रुपयांची रोकडही चोरुन नेली. जाताना त्यांनी परिसरातील चारचाकी वाहनांची तोडफोडही केली. जाताना परिसरात शस्त्रे फिरवत दहशत पसरवली, असे पोलिसांनी सांगितले.