जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा आपण त्याला जगातील प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न करतो. त्याची प्रत्येक मागणी पूर्ण करतो. आपल्या प्रिय व्यक्तीला सर्वात महाग भेट देण्याचा प्रयत्न करतो. असे करून आपण त्याला सांगतो की तो आपल्यासाठी खूप खास आहे. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. या आठवड्यात प्रेमी युगुल एकमेकांशी त्यांच्या मनातील गोष्टी बोलतात. यासोबतच ते एकमेकांना मौल्यवान भेटवस्तूही देतात. प्रेमी युगुल आपल्या मैत्रिणीला ‘चांद तारे’ आणण्याच्या आणाभाका घेताना अनेकदा दिसून येतात. जर तुम्हालाही तुमच्या जोडीदाराला खराखुरा चंद्र भेट म्हणून द्यायचा असेल तर तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल ! इतकेच नव्हे तर तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत सुट्टी घालवण्यासाठी चंद्रावर जाऊ शकता. जाणून घेऊया हे स्वप्न सत्यात कसे उतरेल ?
चंद्रावर घर बनवणाऱ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी तज्ज्ञांची टीम अहोरात्र काम करत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा चंद्रावर जमीन आणि घरे उपलब्ध होतील. मात्र, या जमिनींची किंमत किंवा भाडे किती असेल, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना चंद्रावरील जमिनीचा तुकडा आपल्या जोडीदाराला भेट द्यायचा आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे खरे असेल तर चंद्रावर जमीन घेतल्याने पृथ्वीवरील गरिबीही दूर होईल. यासाठी जगभरातील अर्थतज्ज्ञांनी योजनाही बनवण्यास सुरुवात केली आहे. लवकरच चंद्र जगातील विविध देशांमध्ये विभागला जाईल.
यानंतर, प्रत्येक देश आपल्या वाट्याची जमीन विकून किंवा भाड्याने देऊन त्यातून पैसे कमवू शकतील. तज्ज्ञांच्या मते, चंद्राचे वेगवेगळ्या देशांमध्ये विभाजन करणे हा प्रत्येक देशाचा अधिकार असेल. कारण चंद्र हा सर्वांचाच आहे. त्याच्यावर अधिकार ही कोणा एका देशाची बाब नाही.