बेंगळुरू – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाने आपल्याच पायावर दगड मारून घेतला असेच चित्र यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावात दिसून आले. गेल्या मोसमात अफलातून कामगिरी केलेल्या हर्षल पटेलला बेंगळुरूने मुक्त केले होते. मात्र, त्याची उपयुक्तता लक्षात घेत यंदाच्या लिलावात त्याला पुन्हा मोठी बोली लावून आपल्याकडेच घेतले.
मात्र, या प्रक्रियेत केवळ 20 लाख रुपये बेसप्राइज असलेल्या हर्षलची भक्कम पगारवाढ झाली व त्याला बेंगळुरूने तब्बल 10.75 कोटी रुपयांना पुन्हा खरेदी केले. वास्तविक गेल्या मोसमात बेंगळुरूकडूनच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेत सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज ठरूनही त्याला मुक्त का करण्यात आले, अशीच टीका त्यांच्या संघावर आता होत आहे.