रोम : महिलांना आकर्षित करण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञा असल्याचे भासवून वेबलिंक द्वारे काही डझन महिलांची लैंगिक तपासणी केल्याचे उघड झाले आहे. इटालियन पोलिसांनी या भामट्याचे घर शोधले त्यावेळी या 40 वर्षीय आरोपीकडून अनेक स्मार्टफोन आणि मेमरी कार्डसह धक्कादायक सामुग्री जप्त करण्यात आली.
त्याच्या अनेक रुगणांनी फिर्याद दाखल केली आहे. क्लिनिकमध्ये तपासणीसाठी गेलेल्या महिलांची माहिती मिळवून तो त्यांना फोन करत असे. योनी मार्गात तीव्र संसर्ग झाल्याचे निदान सांगत असे. त्यानंतर ऑनलाइन स्त्रीरोग तपासणी करू असे सांगत असे. अशा पद्धतीने त्याने सुमारे 400 महिलांना लक्ष्य बनवले.त्याने मला डॉक्टर असल्याचे सांगितले. त्याला माझी मासिक धर्माची तारीख आणि जन्मस्थळ माहीत होते. त्याने मला स्त्रीरोगतज्ज्ञाकडून अलीकडे तपासणी केली का असे विचारले.
त्याने काही अत्यंत खासगी प्रश्न विचारले. त्यानंतर त्याने माझे डायग्नोसिस बरोबर आहे का हे पडताळण्यासाठी झूम अथवा हॅंग आऊट वर व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले, असे केवळ लुसिका असे नाव सांगणाऱ्या पीडितेने सांगितल्याचे रिपब्लिका या दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.