बाजार समिती प्रशासनाचा आदेश…..
पुणे – करोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पूर्व पुणे सील केले आहे. या भागात राहणाऱ्या आडते, कामगार, कर्मचारी आणि वाहन चालकांनी मार्केट यार्डातील बाजार आवारात प्रवेश करू नका, असा आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी दिला आहे.
मार्केट यार्ड, गुलटेकडी परिसर ते थेट आरटीओपर्यंतचा भाग सील केला आहे. यामध्ये अनेक पेंठाचा भाग आहे. करोनाचे रुग्ण जास्त मिळाल्याने हा भाग सील करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव या भागातील बाजार घटकांनी बाजारात प्रवेश करू नये, असे परिपत्रक काढले आहे. या आदेशाच भंग करणाऱ्यास साथ नियंत्रण कायद्यातील तुरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्या परिपत्रकात म्हटले आहे.