मुंबई – “शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातून दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री ‘वाणी कपूर’चे नाव बॉलिवूड मधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते. अत्यंत बेधडक, बिनधास्त आणि बोल्ड अशी वाणी कपूरची स्वतःची वेगळी ओळख आहे.
तिचे व्यक्तीमत्त्व, सौंदर्य आणि तिच्या मादक अदांनी तिने अनेक चाहत्यांना घायाळ केले आहे. ती नेहमी सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. असे फोटो शेअर करुन ती आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते.
View this post on Instagram
दरम्यान, अश्यातच वाणी कपूरने इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले असून, सध्या अभिनेत्रीचे हे मादक फोटो सगळीकडे जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीने सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री एकदम फिट आणि हॉट दिसत आहे.
वाणीचे हे फोटो पॅरिस मधील आहेत. वाणीच्या या बोल्ड लूकने पॅरिसमध्ये देखील धुमाकूळ घातला असल्याचं दिसून येत आहे. आता वाणीच्या ग्लॅमरचा तडका हा अनेकांच्या पसंतीस पडताना दिसतो आहे. नेटकऱ्यांनी देखील अभिनेत्रींच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.