डेहराडून :- जागतिक व्याघ्र दिनाच्या दिवशीच जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या ढेला रेंजखालील सावळदे नदीच्या पुलावर वाघिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच कॉर्बेट पार्कच्या ढेला रेंजरसह वन कर्मचाऱ्यांनी वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर हा मृतदेह नष्ट केला जाईल.
कॉर्बेटच्या वनकर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी वाघिणीचा मृतदेह सापडला ती जागा महसूल जमीन आहे, वनखात्याचे क्षेत्र नाही. म्हणजेच ते पश्चिम वनविभागाच्या अंतर्गत येणारे कुरण (गायरान) क्षेत्र आहे.
कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचे झेला रेंजर संदीप गिरी यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी सावळदे ग्रामस्थांनी पुलाखाली वाघिणीचा मृतदेह असल्याची माहिती दिली होती.
या वाघिणीचे वय अंदाजे 5 ते 6 वर्षे असेल. या वाघिणीचा मृतदेह महसूल भूमीच्या अंपोखरा रेंजच्या परिसरात म्हणजेच तराई पश्चिम भागात पडला होता. शवविच्छेदन अहवालात वाघिणीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
रामनगरमध्ये जागतिक व्याघ्र दिनाचा कार्यक्रम सुरु असतानाच एका वाघिणीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.