नवी दिल्ली – अनेक वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी चर्चेत असलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
तीरथ सिंह रावत यांनी म्हंटले कि, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी ठीक असून मला कोणताही त्रास होत नाही. डॉक्टरांच्या निगराणीखाली मी स्वतःला आयसोलेट केले आहे. मागील काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मैं सभी के कुशल स्वास्थ्य की कामना करता हूं।
— Tirath Singh Rawat (@TIRATHSRAWAT) March 22, 2021
दरम्यान, फाटक्या जीन्स (रिप्ड जीन्स)वरून केलेल्या वक्तव्यावरून उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्यावर टीका झाली होती. नैनीताल जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान तीरथ सिंह रावत यांनी ‘करोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? असा प्रश्न उपस्थितांना विचारला होते.
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना तीरथ सिंह रावत यांनी चुकीचा संदर्भ देत नवा वाद उभा केला. यावेळी अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केले असल्याचे विधान तीरथ सिंह रावत यांनी केले आहे.