मुंबई – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराने तब्बल 1 लाख 79 हजार मतांनी जिंकून विजयाचा एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. भाजपच्या या उमेदवाराचे नाव पंकज सिंह असे आहे. ते नोएडा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
पंकज सिंह यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विक्रम मोडला आहे. अजित पवार यांनी 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 1 लाख 65 हजार मतांनी विजय मिळवला होता. इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणारे अजित पवार हे देशातील पहिले आमदार होते.
पंकज सिंह यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी यांचा पराभव करत मोठे यश संपादित केले आहे. तसेच बसपाकडून कृपाराम शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर कॉंग्रेसकडून पंखपडी पाठक नावाचे उमेदवार होते. पाठक हे या निवडणुकीत चर्चेत आले होते.