भारतातील पेट्रोलचे दर अमेरिका ठरवते; रावसाहेब दानवेंचा अजब दावा

औरंगाबाद  – महाराष्ट्रासह देशभरात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. पण पेट्रोलचे भाव हे केंद्र सरकार निश्‍चित करत नाही तर अमेरिका ठरवते, असा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

औरंगाबादमध्ये ते बोलत होते. रावसाहेब दानवे म्हणाले, देशातील इंधनाच्या वाढत्या किंमती आणि महागाईवरुन रविवारी कॉंग्रेसने मोर्चा काढला होता. देशात आणि राज्यात पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत, पण आपण यावर काही बोलणे योग्य नाही, असे सांगत ते म्हणाले की, “पेट्रोलचे दर हे आता जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहेत. त्यामुळे या किंमती वाढण्यामागे केंद्र सरकारचा हात नाही.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती या रोज खाली-वर होतात. या किंमती आता अमेरिकेत ठरवल्या जातात. त्यामुळे केंद्र सरकारला यावरुन दोष देणे चुकीचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्‍त केले.


केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी केल्याने त्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व्हॅट कमी करत नाही, असेत म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.