वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा लष्कर प्रमूख कासम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराण जशास तसे उत्तर देण्याची शक्यता असून अमेरिकेच्या वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या जीवित रक्षणासह कोणत्याही हल्ल्याला प्रत्यूत्तर देण्याची तयारी अमेरिकेने केली आहे.
मध्यपुर्वेतील जल वाहतुकीतून अमेरिका इंधन वाहतूक करते. त्यावर इराण कारवाई करण्याची शक्यता आहे. अमेरिकेविरूध्द कोणती कारवाई करायची याबाबत इराणी लष्कराच्या हालचाली टीपण्यास अमेरिकन गुप्तचरांना अद्याप यश आले नाही. मात्र येत्या एक दोन दिवसांत इराण हल्ला करण्याची शक्यता अमेरिकन संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क इस्पेर म्हणाले, इराकमधून फौजा परत घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान इराण समर्थक संघटनांनी इराकमधून अमेरिकन फौजा माघारी घ्याव्यात म्हणून मोर्चेबांधणी केली आहे. अमेरिकेचे नौदल प्रशासनाने जहाजांना इशारा दिला आहे. गेल्यावर्षी तेल वाहतूकदार जहाजांवर झालेल्या हल्ल्यांना इराण जबाबदार असल्याची भूमिका अमेरिकेने घेतली होती.