#महाराष्ट्रकेसरी : नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी

पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळकेला नमवून ६३ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या विजेतेपदाची मानाची गदा पटकावली आहे. हर्षवर्धन याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या किताबी लढतीत शैलेशचा ३-२ असा पराभव केला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा पाडली. या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याच्या रूपानं नवा ‘महाराष्ट्र केसरी’ महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. अंतिम लढतीसाठी यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार हे उपस्थित होते.

दरम्यान, गादी विभागाच्या अंतिम फेरीत हर्षवर्धन सदगीर याने निर्णायक क्षणी अभिजित कटकेला ५-२ ने नमवित ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीत प्रवेश केला होता.

दुसरीकडे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या बाला रफिक शेखला चितपट करत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने बाजी मारली होती. त्यानंतर माती विभागातील अंतिम लढतीत शैलेश शेळके याने सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेचा शेवटचे ३ सेंकद बाकी असताना पराभव केला होता. शैलेशने ही लढत ११-१० अशी जिंकत ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीत प्रवेश केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.