वॉशिंग्टन – अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपातील निर्बंध लागू केले आहेत. युक्रेनवर केलेल्या बेकायदेशीर हल्ल्यासाठी अमेरिकेने पुतीन यांना थेटपणे जबाबदार धरले आहे. या निर्बंधांच्या निर्णयामुळे अमेरिका पुतीन यांच्या अन्य देशांतील मालमत्तांवर थेटपणे टाच आणू शकेल.
कोरियाचे किम जोंग उन, बेलारूसचे अध्यक्ष अल्याक्सॅंडर लुकाशेन्का आणि सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांसारख्या हुकुमशहांच्या गटात आता पुतीनही सामील झाले आहेत असे अमेरिकेने म्हटले आहे.
या हुकुमशहांचा जगातील हा गट अत्यंत छोटा आहे, त्यांना जगाकडून कोणतीही मदत मिळू शकणार नाही असेही अमेरिकेने या संबंधात जारी केलेल्या एका निवेदनात नमूद करण्यात आले आहे.